<
जळगांव(प्रतिनीधी)- आजच्या सांस्कृतीक अवर्षणाच्या काळात जळगाव सारख्या शहरातील परिवर्तन ही संस्था स्व निर्मित कार्यक्रमाचा महोत्सव पुण्यात करते ही गोष्ट सांस्कृतिक क्षेत्राला बळ देणारी आहे. महाराष्ट्रात महोत्सव संस्कृति रुजवणयाच काम परिवर्तन करत आहे. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स आणी नाटकघर आयोजीत परिवर्तन कला महोत्सवांच उद्घाटन रंगाचे फटकारे मारत उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी उल्हास दादा पवार, रंगकर्मी नंदू माधव, अतुल पेठे, शुभांगी दामले, विजय बाविस्कर, राष्ट्रसेवादलाचे गोपाळ नेवे, रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे रितेश बाफना, मंजूषा भिडे, हर्षल पाटील उपस्थित होते. कँन्हव्हास वर रंगाचे फटकारे मारून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पाहूण्यांच स्वागत शिरिष बर्वे, सोनाली पाटिल, हर्षदा कोल्हटकर यांनी केले. परिवर्तन जळगावचा कला महोत्सव पुणे येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहात हा महोत्सव दिनांक ३ ते ५ जानेवारी या कालवधित होणार आहे. या महोत्सवाच उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते झाल. या महोत्सवाला पुणेकर रसीकानी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पहिल्या दिवशी शंभु पाटिल लिखित व दिग्दर्शित गांधी नाकारायचाय… पण कसा ? हे अभिवाचन नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटील व विजय जैन या कलावंतानी सादर केले. प्रकाश योजना राहुल निंबाळकर, पार्श्वसंगीत वसंत गायकवाड यांचे होते. पहिल्या दिवसाच्या या वैचारिक अभिवाचनाने सर्वच रसिकांना अन्तर्मुख केले. आज सांय ७ वाजता अमृता, साहिर, इमरोज है नाटक तर नली नावच एकल नाट्य सादर करण्यात येणार आहे. आज पुण्यामधील अनेक मान्यवर सभागृहात हजर होते. कुमार सप्तर्षि, अन्वर राजन, सुप्रसिद्ध वास्तु शिल्पकार शिरिष बेरी हजर होते.