<
प्रेक्षकांना चार दिवसात मिळणार पंचवीस नाटकांची मेजवाणी
जळगाव-(जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध 10 केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. जळगाव येथे राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, दिनांक 6 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होणार आहे. 6 ते 9 जानेवारी दरम्यान एकूण पंचवीस नाटकं राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभागी होणार असून नाटक, वेळ, लेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्त्या संस्था पुढीलप्रमाणे ..
सोमवार, दि. 06 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता. म्याव म्याव निरंजन, लेखक-नितीन वाघ, दिग्दर्शक-रश्मी लाहोटी, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल, जळगाव. सकाळी 10.45 वाजता बुडबुडे, लेखक- नितीन वाघ, दिग्दर्शक-अनुराधा धायबर, विवेकानंद प्रतिष्ठान, इंग्लिश मिडीयम स्कुल, जळगाव. दुपारी 1.15 वाजता एक बन-नेक बनो, लेखक- रत्नाकर रानडे, दिग्दर्शक- विवेक देशपांडे, तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव. दुपारी 2.30 वाजता ओम मर्कटय नम:, लेखक- नितीन वाघ, दिग्दर्शक- नरेश पाटील, स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कळमसरा. दुपारी 3.45 वाजता पिशवी,लेखक- रुपाली गुंगे, दिग्दर्शक- राज गुंगे, सुबोध बहुउद्देशिय युवा विकास प्रसिष्टान, जळगाव. मंगळवार, दि.7 जानेवारी रोजी सकाळी 10.15 वाजता जिद्द, लेखक- सोनाली वास्कर दिग्दर्शक- विनोद उबाळे, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ, भुसावळ. सकाळी 11.00 वाजता कियारा, लेखक- पद्माजा घैसास, दिग्दर्शक- मानसी भदाणे, उज्वल एज्युकेशन ट्रस्ट, जळगाव. दुपारी 12.45 वाजता दमळी, लेखक- डॉ.हेमंत कुलकर्णी, दिग्दर्शक- उल्हास ठाकरे, शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगाव. दुपारी 2.00 वाजता लव-कुश, लेखक आणि दिग्दर्शक- ऊषा चोरघडे, श्री.समर्थ मठ संस्थान, इंदौर. दुपारी 3.15 वाजता पुढच्या वर्षी लवकर या, लेखक-सुहास देशपांडे, दिग्दर्शक-किरण लद्दे, रंगगंध कलासप्त न्यास, चाळीसगाव. दुपारी 4.30 वाजता चक्रमपुरचा खादाड राजा, लेखक- रेणुका भिडे, दिग्दर्शक- निलेश भोई, ओंकारेश्वर बहुउद्देशिय संस्था, विरतेर, जळगाव. बुधवार दि. 8 जानेवारी सकाळी 9.30 वाजता असुद्या-हसुद्या, लेखक- नारायण घोडके, दिग्दर्शक- अलका भटकर, महाराणा प्रताप विद्यालय, भुसावळ. सकाळी 10.45 वाजता आम्हीच टिळक, लेखक- रविंद्र सातपुते, दिग्दर्शक -सुनिता पाटील, बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली. दुपारी 12.00 वाजता आई मला छोटीशी बंदुक देना, लेखक-वैभव मावळे, दिग्दर्शक-आकाश बाविस्कर, काशिबाई ऊखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव. दुपारी 1.15 वाजता पोपट आणि आम्ही, लेखक- योगेश पाटील, दिग्दर्शक-उत्कर्ष नेरकर, जीवन विकास सामाजिक संस्था, जळगाव. दुपारी 2.30 वाजता ईर्षा, लेखक- रत्नाकर रानडे, दिग्दर्शक्- रविंद्र देशपांडे, हिरनाताई जोशी प्राथमिक विद्यालय, चाळीसगाव. दुपारी 3.45 वाजता गिफ्ट, लेखक आणि दिग्दर्शक- किरणकुमार अडकमोल, फ्लाईंग बल्ड फाऊंडेशन, जळगाव. सायंकाळी 5.00 वाजता लाल चिखल, मुळ लेखक- भास्कर चंदनशिवे, अनुवाद- विशाल जाधव, दिग्दर्शक- प्रांजली रसे, ईस्ट खान्देश् एज्युकेशन सोसायटी, जळगाव- गुरूवार दि.9 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता बालपण हरवलंय, लेखक- किरण लद्दे, दिग्दर्शक- हेमांगी पुर्णपात्रे, डॉ. काकासाहेब पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव सकाळी 10.45 वाजता मु. पो. कळमसरा, लेखक- नितीन वाघ, दिग्दर्शक- सुशील चंदनकर, चंदनकर अकॅडमी, जळगाव. दुपारी 12.00 वाजता पडसाद, लेखक- धनंजय सरदेशपांडे, दिग्दर्शक- सुजय भालेराव, लोकमंगल कलाविष्कार संस्था, धुळे. दुपारी 1.15 वाजता एप्रिल फूल, लेखक- प्रकाश पारखी, दिग्दर्शक- केदार नाईक, स्त्री शिक्षण संस्था, धुळे. दुपारी 2.30 वाजता धरती संग रंगबेरंगी, लेखक- अमोल अरूण, दिग्दर्शक- दिशा ठाकूर, विवेकानंद विद्यामंदिरक, भुसावळ, दुपारी 3.45 वाजता अ..आ..आकलन, लेखक आणि दिग्दर्शक- संदिप घोरपडे, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, अमळनेर याप्रमाणे नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार असून रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.