<
जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी
जळगाव-(प्रतिनिधी)-जिल्हा नियोजन व विकास समितीची सभा काल पालकमंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभेत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव शहरातील विविध समस्येवर घणाघात भाषण करून वाचा फोडली. सर्वात आधी ना.गिरिषभाऊ महाजन पालकमंत्री झाल्याबद्दल व पालकमंत्री पद देणारे मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस यांचा अभिनंदनाचा ठराव सभेत मांडला.
वरणगावात एम.जे.पी. ने 3 कोटी 47 लाख रुपयांचा सांडपाणी प्रकल्प चुकीच्या पद्धतीने उभारला गेल्याने तो प्रकल्प 5 वर्ष झाले तरी सुरू झाला नाही एकीकडे सरकार ज्या नद्या प्रदूषित आहे त्या स्वच्छ करण्यासाठी प्रयत्नशील असून निधी देते मात्र एम.जे.पी.ने संपूर्ण शहरातील सांडपाणी हे भोगावती नदीमध्ये काढून भोगावती नदी प्रदूषित केली असून संपूर्ण घाण वास येत असून नागरिकांना आरोग्याला बाधा ठरत आहे जिथे गटारीची आवश्यकता असताना तिथे न करता नगरपरिषदेची परवानगी न घेता स्ट्रक्चरल ऑडिट न करता चंगल्या गटारी तोडल्या गटारीद्वारे सांडपाणी थेट प्रकल्पापर्यन्त नेणे बंधनकारक असतांना सुद्धा मनमानी पद्धतीने दबावापोटी चुकीचे काम केली जे जे जबाबदार असतील त्यांच्या वर 3 कोटी 47 लाख रुपयांचा अपव्यय केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. तात्काळ चौकशी समिती लावून कार्यवाहीचे आश्वासन पालकमंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांनी दिले तसेच वरणगाव शहरात बंद असलेल्या रेशनकार्डवर दुकानदारांनी धान्य देणे बंद केल्याने गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्या बंद रेशनकार्ड वर धान्य सुरू करण्यात यावे, तसेच आयुधनिर्मानी व कब्रस्थान कडे जाणाऱ्या नवीन महामार्ग प्राधिकरणाने पूल बांधण्यात यावा, तसेच शेतकऱयांनी जमिनी दिल्या रस्त्यासाठी त्यांना मोबदला देण्यात यावा, तसेच शहरात सिदेश्वर महादेव मंदिर, स्वामी समर्थ मंदिर रावजीबुवा मंदिरांना तीर्थक्षेत्र (क) दर्जा देण्यात यावा, सिदेश्वर नगरकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने नागरिकांना ये जा करताना मोठा त्रास होतो तो ही प्रश्न मार्गी लावावा, सेंट्रल बँकेत जेष्ठ नागरिकांना त्रास होतो तो थांबवनियात यावा, नगरपरिषदेला भरगच्च निधी देण्यात यावा अश्या वरणगावकरांच्या दृष्टीने महत्व पूर्ण मागण्या पालकमंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांच्याकडे सभेत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मांडल्या पालकमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही चे आश्वासन यावेळी दिले.