<
जळगांव – (प्रतिनिधी) – येथिल समाज चितांमणी प्रतिष्ठान तर्फे स्त्रीमुक्ती स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आधुनिक काव्याच्या जनक असल्याचे विचार याप्रसंगी झालेल्या चर्चासत्रात मांडण्यात आले.
समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : जीवनकार्य या विषयावर चर्चासत्राचे आयोजन समाज चितांमणी प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले होते.
भगीरथ इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य, त्यांचे काव्यफुले, बावन्नकशी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह, सतीबंदी, विधवाविवाह, केशवपन, बालहत्या, या सामाजिक सुधारणांसाठी दिलेला लढा, प्लेगग्रस्तांसाठी केलेले कार्य या घटकांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.प्रभाकर चौधरी होते.
याप्रसंगी झालेल्या साहित्य चर्चेत ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर, सिंधुताईंचे मानसपुत्र लेखक डी. बी. महाजन, प्रा. नारायण पवार, डॉ. सुषमा तायडे, संतोष मराठे, दिपक सपकाळे, प्रा. प्रकाश महाजन, गोविंद देवरे, अरुण कुमार जोशी, प्रज्ञा नांदेडकर, गोविंद पाटील, अरुण वांद्रे, अशोक पारधे, शीतल पाटील यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी. कोळी यांनी आभार व्यक्त केले.
(टीप – समाज चिंतामणी प्रतिष्ठान, जळगाव ही संस्था सामाजिक, साहित्यिक उपक्रम राबवत असते. ज्यांना यात अभिरुची असेल त्यांनी अध्यक्ष आर. डी. कोळी यांच्यांशी मो. क्र. 9860705108 यावर संपर्क साधावा.)