<
जळगांव(प्रतिनीधी)- पुणे येथे झालेल्या होणार मी सौदर्यंवती महाराष्ट्राची या स्पर्धेत जळगांवच्या सौ निशा विजय पवार यांनी महाराष्ट्र सुंदरीचा प्रथम मुकुट पटकावला. या स्पर्धेत नागपूर, सोलापूर, पुणे, नांदेड, मुंबई, औरंगाबाद आदी शहरातून स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये स्पर्धकांनी सावित्रीबाई फुले, झांसी ची राणी, माँसाहेब जिजाऊ, माता रमाई अशा वेगवेगळ्या वेशभूषा साकारल्या होत्या. यामध्ये निशा पवार यांनी झांसी ची राणी यांची डोळ्याची पारणे फेडणारी वेशभूषा साकारली होती. यामध्ये त्यांनी त्यांची लहान कन्या देवश्री हिला देखील आपल्या पाठीशी बांधून हुबेहूब झांशीच्या राणीची वेशभूषा साकारली. त्यांचा सुप्त गुणांची दखल घेत त्यांना होणार मी सौदर्यंवती महाराष्ट्राची या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळाला. यामध्ये त्यांनी जळगावचे नाही तर संपूर्ण खान्देशाचे नाव राज्यपातळीवर नेले. तसेच निशा पवार या स्पर्धोंबरोबरच सामाजिक कार्यातही जळगांव शहरात आपला एक वेगळा ठसा उमटवताना दिसून येतात. त्या शिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या सौभाग्यवती आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबदल त्यांचे सर्वस्तरातून कौतूक केले जात आहे.