<
मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांना केले अभिवादन
मुक्ताईनगर(प्रतिनिधी)- आज दिनांक ६ रोजी शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मोहन मेढे यांनी प्रथम आपले मनोगत व्यक्त करतानासांगितले की, आज ६जानेवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांची आज जयंती पण असते या दिवशी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी मधील वृत्तपत्र सुरू केले होते, नंतर बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस भारतीय बहुउद्देशीये पत्रकार संघाचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मोहन मेढे व उपाध्यक्षसतिश गायकवाड यांच्या हस्ते माल्यार्पण करून नमन करण्यात आले, यावेळी मुक्ताईनगर कार्याध्यक्ष रिजवान चौधरी, श्री सोनार,श्री तायडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एल सी सावखडेकर, एस एस देशमुख, एस टी भोईकर, पी आर मालवेकर, आर आर शेख, आय व्ही तायडे व संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गायकवाड यांनी केले तर रिजवान चौधरी यांनी आभार मानले.