Thursday, July 10, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संविधान बचाव नागरी कृती समिती महा मोर्चामध्ये हजारो लोकांची गर्दी उसळली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2020
in विशेष
Reading Time: 2 mins read
सर्व धर्मीय रैली ने सर्वांचे लक्ष वेधले

रावेर-(प्रतिनीधी) – भारतीय नागरिकत्व कायदा, एन आर सी व एन पी आर याला त्वरित रद्द करा ह्या एकमेव मागणीसाठी संविधान बचाव नागरी कृती समिती जळगाव मार्फत जळगाव जिल्ह्यातील ५५ संघटनांनी महामोर्चा चे आयोजन केले होते या पंचावन्न संघटनेमध्ये मुस्लिम समाजासह हिंदू, आदिवासी, बौद्ध ,मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय या संघटनांचा सक्रिय सहभाग होता.मुस्लिम महिलांची ची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. खानदेश मॉल सेंटर येथून निघालेल्या या मोर्चात हजारोच्या संख्येने महिला व पुरुषांचा समावेश होता मोर्चा च्या सुरुवातीला वाहनावर शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या.

त्यानंतर आदिवासी बांधवांचे ढोल पथक होते या ढोल ताशा वर आपल्या संस्कृतीप्रमाणे आदिवासी बांधव नाच व गाणे म्हणत होते.त्यानंतर २० मीटर लांबीचा एक बॅनर होता त्यावर सी ए ए, एन आर सी व एनटीआर त्वरित रद्द करा मागणीसाठी हा मोर्चा असून सदरचा फलक पाच मुस्लिम तरुणी, पाच आदिवासी महिला, पाच बौद्ध समाजाच्या महिला व पाच हिंदू समाजाच्या महिला अशा २० महिलांनी ते बॅनर हातात घेतले होते मोर्चा जेव्हा क्रीडासंकुलात समोर आला तेव्हा त्याचे शेवटचे टोक हे खानदेश मॉल येथे होते .

जाहिर सभा

अत्यंत शिस्तप्रिय अशा मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाहीर सभेत रूपांतर झाले जाहीर सभेत यांनी केले मार्गदर्शन मौलाना आझाद चे करीम सालार, राष्ट्रवादी प्रदेश चे अब्दुल गफ्फार मलिक, जमियात उलमा चे मुफ़्ती हारून संविधान, बचाव समिती भुसावळचे एडवोकेट एहतेशाम मलिक, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना च्या कल्पिता पाटील, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे ईश्वर मोरे, संविधान जागर समितीचे प्राध्यापक प्रीतीलाल पवार, नियाज अली फाऊंडेशनचे अयाज अली, जमात-ए-इस्लामी चे आमीर सोहेल, एस आय ओ महिला विंगच्या नीलोफर इक्बाल, अमोल कोल्हे ,शिवराम पाटिल, नगरसेवक इब्राहिम पटेल आवाज फाऊंडेशनचे जमील देशपांडे, रेडक्रॉस गनी मेमन,ईश्वर मोरे, रविन्द्र भैय्या पाटिल, खलील देशमुख, यांनी मार्गदर्शन केले.

सभेत एकूण सहा ठराव पारित करण्यात आले

नरेंद्र पाटिल फॉउंडेशन चे एडवोकेट विजय पाटील, मराठा सेवा चे सुरेंद्र पाटील, सिव्हील सोसायटीचे रागीब जहागीरदार, मुस्लिम मंच चे फारुक शेख, योगेश पाटील व राजेश पाटील यांनी ते सहा ठराव सभेसमोर मांडले असता त्याला हजारोच्या संख्येने मंजुरी देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात लहान विद्यार्थिनी शरीया रउफ खान हिने देशभक्तीपर कवितेने सुरवात करण्यात आली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद सपकाळे यांनी केले तर आभार फारुक शेख यांनी मानले.शासनास दोन निवेदने देण्यात आलीमाननीय पंतप्रधान व माननीय राष्ट्रपती यांना माननीय जिल्हा अधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे व पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांच्या हस्ते देण्यात आले .पहिले निवेदन संविधान बचाव कृती समिती जळगाव यांच्यातर्फे रॅली च्या वतीने सी ए ए ,एन पी आर, एन आर सी घटनाविरोधी तरतुदी नियम तात्काळ रद्द करा, या देशाच्या सर्व धर्म समभाव या घटनात्मक आत्म्याचे संरक्षण करणेबाबत होते तरदुसरे निवेदन जेएनयू विद्यापीठात गुंडांनी आणि उत्तर प्रदेश आसाम कर्नाटक राज्यांमध्ये पोलिसांमार्फत घडविल्या जाणाऱ्या शासन संमत हिंसाचारा बाबत होते.सदरचे निवेदन मुकुंद सपकाळे व गफ्फार मलिक यांच्या हस्ते देण्यात आले तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाला फारुक शेख यांनी दोघी निवेदना बाबत थोडक्यात माहिती विशद केली या मागण्या आपण शासनाला कळवाव्यात व आमच्या भावनासुद्धा कडव्यात हजारो संख्येने मोर्चेकरी आले असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला नाही व जळगाव जिल्ह्यात सर्व धर्मीय समावेशक, सर्व जाती जमाती यांनी एकत्रित येऊन हा मोर्चा काढला हे जळगाव पॅटर्न सर्वदूर अमलात आणावे अशी मागणी सुद्धा केली.

निवेदन यांच्या स्वाक्षरी देण्यात आले..
सुरेंद्र पाटील, एडवोकेट विजय पाटील, मुकुंद सपकळे,विनोद देशमुख ,फारूक कादरी, ईश्वर मोरे, विकास मोरे, प्रीती लाल पवार ,सचिन धांडे, आमीर सोहेल, मुस्ताक शेख, आदींची उपस्थिती होती.मोर्चा व जाहीर सभेत यशस्वीतेसाठी यांनी केलेले प्रयत्न. 
अनिस शाह, इमरान फारिस,सानिर सय्यद ,कासिम उमर,अनवर खान,उबेद बेलदार,इक़बाल बेलदार, तय्यब शेख , जावेद खान,अज़ीज़ सिकलीगर, बशीर बुरहानी, सय्यद शाहिद,फारूक अहेलेकार, अन्वर शिकलकर, सलीम मनियार, सलीम पठाण, अब्दुल रब, शेख रेहान, मुस्लिम मंच व लोकसंघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

फिरोज शेख व वैशाली विसपुते यांना नाना शंकर शेठ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Next Post

श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय लंगडी स्पर्धेत घवघवीत यश

Next Post
श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय लंगडी स्पर्धेत घवघवीत यश

श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय लंगडी स्पर्धेत घवघवीत यश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications