<
जळगाव-(जिमाका) – उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील शासकीय जागेवर रस्ता सुरक्षा प्रबोधिनी सभागृह व सलग्न गोडाऊनचे भुमिपुजन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या हस्ते 9 जानेवारी 2020 रोजी संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाचे डी. एस. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता एस.आर.राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही , सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.