<
मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- येथील शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी दु १२ वाजता महसूल, पोलीस व नगरपंचायत या तिघही विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली. शासकीय विश्रामगृहावर शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार शहरातून इंदौर औरंगाबाद महामार्गाचे MSRDC अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्याची एक पूर्ण बाजू खोदकाम झालेली असून दुसऱ्या बाजूने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस विभागाने वाहतूक नियंत्रित ठेवावी. त्यातच श्री संत मुक्ताई यात्रेचा महोत्सव जवळ येत असुन त्यामुळे येथे उपाय योजना होण्या अत्यंत गरजेच्या आहे अशा सूचना आ.पाटील यांनी दिल्या . तसेच याच महामार्गाचे काम सुरू असताना शहरातील कुठली पाणी पुरवठ्याची पाईप लाईन बाधित होत असेल, कारण एकदा का काँक्रीटीकरण रस्ता पूर्ण झाला तर सदर पाईप लाईन चे लिकेज काढणे व इतर कामे करणे जिकरीचे होईल. त्यामुळे आजच ही पाईप लाईन रस्त्यातून काढून बाजूला काढण्यात यावी व हा खर्च नवीन पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडे मागणी करावी. तसेच मुक्ताईनगर नगरपंचायत ची पाणी पुरवठा योजना संबधीत विभागाकडे अडकून पडली आहे .अशी माहीती मुख्याधिकारी यांनी दिली. त्यामुळे ही योजना कोणाकडे रखडली आहे याबाबत माहिती देतो असे ही त्यांनी सांगितले. त्यातच हतनूर धरणातून मानसी १३५ लिटर पाणी आरक्षित करावे लागते हा विषय अपूर्ण आहे असे मुख्याधिकारी यांनी सांगताच आ. पाटील यांनी माहिती द्यावी हे काम पूर्णत्वास नेतो अशा सूचना केल्या. तसेच तहसिलदार यांच्याशी चर्चा करतांना संगायो व विविध लाभार्थी योजना प्रकरने प्रलंबित आहेत ते तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या, आणि पुरवठा विभागात शिधा पत्रिका व तत्सम कामांबाबत अडचणी येत असल्याने येते कर्मचारी तुटवडा पडतो व प्रभारी राज कामकाज असल्याने हा बोजवारा वाढला असल्याचे तहसीलदारांनी सांगितले तेव्हा याबाबत पालकमंत्र्यांशी संवाद साधून मार्ग काढण्यात येईल असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सदर पार पडलेल्या आढावा बैठकीत तहसिलदार शाम वाडकर, नायब तहसिलदार प्रवीण झाम्बरे, पोलीस उपविभागीय अधिकारी बोरसे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, मुख्याधिकारी सौरभ जोशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, शुभम शर्मा, दीपक पवार यांची उपस्थिती होती.