<
जयंतीनिमित्त “बेटी बचाव बेटी पढाव” रॅलीचे आयोजन
जळगाव(प्रतिनिधी) – येथील सरस्वती विद्या मंदिरात राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम राजमाता जिजाऊ यांचा प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना वसाने यांचा हस्ते करण्यात आले. या वेळी शिक्षकांनी मनोगतात स्त्री शिक्षणाचे महत्त्व व राजमाता जिजाऊ यांचे कार्या बाबत विद्यार्थ्यांना माहिती व मार्गदर्शन केले. तसेच शिव कॉलनी परिसरात बेटी बचाव बेटी पढाव रॅली काढण्यात आली. परिसरातील नागरिकांनी रॅलीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी रॅलीत जय शिवराय, जय जिजाऊ, बेटी बचाव बेटी पढाव अश्या विविध घोषणा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले. ग.स सोसायटीचे तथा संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांचे प्रोत्साहन यावेळी लाभले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना वसाने यांनी मार्गदर्शन केले. नीलिमा भारंबे, उज्वला ब्रम्हणकर, सुदर्शन पाटील, यांचे सहकार्य लाभले.