<
मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- येथे जिजाऊ जन्म उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता, या वेळी सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या विचार युवकांनी आत्मसात करण्याची गरज असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रम शासकीय विश्रामगृह येथे मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील मराठा समाजाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष माणिकराव पाटिल, माजी सभापती राजेंद्र माळी, नगरसेवक डॉ.प्रदीप पाटील मराठा सेवा संघाचे दिनेश कदम, ह-भ-प भाऊराव महाराज, सुभाष पाटील, डॉ. जगदीश पाटील, अफसर खान, दिलीप पाटील, हकीम चौधरी, साहित्यिक अ.फ.भालेराव, हरुण शेख, कलीम मनियार, अशिफ खान, रिझवान चौधरी, सुनील पाटील, सोपान मराठे, प्रफुल पाटील, सचिन जैन आदी मान्यवर उपस्थित होते.