<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात शुक्रवारी आयोजित मेळाव्यात भेळची चव घेऊन उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोक शिक्षण मंडळाचे चिटणीस अवधूत पाटील, राकेश कोल्हे, मुख्याध्यापिका सौ जे.आर.गोसावी, उपमुख्याध्यापक ए .व्ही .ठोसर, शिक्षिका पी.ए.पाटील, पी. पी.अत्तरदे, के. एच. घुले, पी .बी .सोनवणे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना व्यवहार नफा-तोटा या संकल्पना ची माहिती मिळावी म्हणून या मेळाव्यात विविध खाद्यपदार्थ वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले होते. पाणीपुरी, भेळ, वडापाव यासारख्या खाद्यपदार्थांनी मेळाव्यात चांगलीच लज्जत भरली तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील यावेळी विविध पदार्थांची चव घेतली. विद्यार्थ्यांनी एकूण ४४स्टॉल लावले होते. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.