<
जळगाव(प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मकरसंक्रांत निमित्त पतंग महोत्सव उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती मातेचे पूजन संस्थेचे तथा ग.स. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थिनींनी हलवाई चे दागिने बनविले होते. यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापिका कल्पना वसाने व दिपाली देवरे यांनी केले. तर मकरसंक्रांत चे महत्व सुलोचना पाटील यांनी सांगितले. मनोगत सुवर्णलता अडकमोल व विनय गायकवाड यांनी व्यक्त केले. मानवा कृती पतंग बनविण्यास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी पतंग उडवून तर मुलींनी हातावर मेहंदी काढून महोत्सव साजरा केला. सूत्रसंचालन कल्याणी सुतार यांनी केले तर विद्यार्थ्यांना तिळ गुळाचे लाडू खावू वाटप म्हणून राजेंद्र पाटील यांनी दिले. प्रमुख अतिथी म्हणून एकनाथ सुतार हे उपस्थित होते.