<
जळगाव(प्रतिनिधी)- आज भूगोल दिनानिमित्त भूगोल या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण होऊन त्यांना अभ्यासात मदत व्हावी यासाठी प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी मैदानावर अमावस्या, अष्टमी व पोर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकला तसेच त्या त्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थितीदेखिल विद्यार्थ्यांना समजावी यासाठी मैदानावर प्रतिकृति उभारून प्रत्यक्ष अनुभवातुन त्यांना त्याविषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवले व आमवस्या, अष्टमी व पोर्णिमा या संकल्पना स्पष्ट करून दाखवल्या. यासाठी त्यांनी मैदानावर प्रत्यक्ष आखनी करून तसेच विविध पोस्टर्स बनवून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग घेतला व सूर्य पृथ्वी चंद्राच्या कला यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. अमावस्येला चंद्र का दिसत नाही? पोर्णिमेला चंद्र पूर्ण का दिसतो? चंद्राची रोज आपल्याला दिसणारी कोर कशी काय कमी कमी होत जाते व कशी वाढत जाते? या प्रश्नांच्या उत्तरांचे समाधान त्यांना या प्रत्यक्षिकातुन प्रत्यक्ष त्यांच्या अनुभवातुन विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले. स्वनुभवातून शिक्षण या कलुप्तिचा उपयोग करत विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव दिला. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमेन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे, शिक्षक रमेश ससाने, पंकज नन्नवरे व शिक्षकेतर कर्मचारी किशोर तिवारी यांनी परिश्रम घेतले.