<
नांद्रा/पाचोरा(प्रतिनीधी)- येथील अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयात दोन दिवशीय स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन मुख्यध्यापक एस.पी.तावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. त्यात दि १३ व १४ रोजी तंबू उभारणे, तंबू सजावट, ग्रामसफाई, शेकोटी, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शोभायात्रा, बिनभांड्याचा स्वयंपाक, माँ जिजाऊच्या जीवनावर व्याख्याते अविनाश निकम यांचे व्याख्यान आदी उपक्रम उत्साह पुर्वक पार पडले. स्काऊट गाईड शिबिराचे उद्घाटन स्थानिक कमिटीचे अध्यक्ष डॉ. वाय. जी. पाटील यांनी केले. आज गावातुन निघालेल्या शोभायात्रेने संपुर्ण गावाचे लक्ष वेधुन घेतले. स्थानिक सल्लागार कमिटीचे सदस्य , ग्रामस्थ, पालक, माता बहुसंख्येने उपस्थित होते. नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना स्काऊट गाईड कडून फळे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.पी.तावडे, एस.व्ही.शिंदे, पी.एस.चौधरी, आर.एन.पाटील, गजानन ठाकुर, आर.व्ही.सपकाळे, अविनाश निकम यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.