<
जळगांव(प्रतिनीधी)- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती पीत्यार्थ गावातील मृत व्यक्तीच्या सुरक्षितेसाठी शवपेटी चे आज लोकार्पण केले. यावेळी गावातील माजी सरपंच किशोर आगीवाल, पोलीस पाटील नितीन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ सोनवणे, दिलीप आगीवाल, जगदीश पाटील, पितांबर सपकाळे, निलेश वाघ, संजय सोनवणे, सुरेश सोनवणे, हितेश आगीवाल, राजेंद्र पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.