सोबत मजला निळ्या आकाशाची
हितगूज बोले मी फुलांपाशी ।।धृ।।
वाऱ्यासंगे डोलत वृक्षलती
फुलपाखरे सोबती सखे रंगीत पक्षी ।।१।।
हे मन माझे मोहती
आकाशी जिवनाचा दिसे मज
क्षणोक्षणी चित्रपट नवा नवा ।।२।।
संगे चांदण्या खुले नाजूक चंद्रकळी
मिलन संध्या यामिनी
डोंगरापल्याड जाई रोज वासरमणी ।।३।।
जाता दिनकर येता रैना
धरेवरी हा साज पहा ना ।।३।।
उघडती नभात
इंद्राचे सहस्र डोळे
पृथ्वीवर मांगल्यात
दिपमाळा उजळे ।।५।।
स्वतः जळुनी उजेड देती
सार्थक जीवने तृप्त होती ।।६।।
मिटली जरी पापणी उरले समाधान
जववरी तेल दिव्यात
तववरी जळते वात ।।७।।
आयुष्यरूपी तेल संपले
विझली जीवनज्योती
मग कोण मम सांगाती
एकट्या तुझ्या वाचोनी
चक्रपाणी! ।।८।।

– शितल शांताराम पाटील
शेळगाव .जि. जळगाव
9325533279










