जळगाव- (जिमाका) :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त 26 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे राष्ट्रध्वजवंदन व संचलन समारंभ आयोजित करण्यात आला आहे..
या शासकीय समारंभात जास्तीत जास्त नागरिकांना भाग घेता यावा यासाठी दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8.30 ते 10.00 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात येवू नये. एखादा कार्यालयास अथवा संस्थेस आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10.00 वाजेनंतर करावा. या कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.