<
यासाठी सर्वांनी आरोग्य विभागास सहकार्य करावे– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे
जळगाव-भारतात आज पल्स पोलिओचा एकही रुग्ण नाही परंतु शेजारील पाकिस्थान, अफगाणीस्थान, बांगला देश यासारख्या शेजारील देशात अजूनही पल्स पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने त्याचा प्रार्दुभाव आपल्या देशात होवू नये म्हणून आपण अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत 19 जानेवारी 2020 रोजी पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन केले असून सदर मोहिमेंतर्गत आपल्या 0 ते 6 वर्षापर्यंत सर्व बालकांना लसीकरण करून एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहणार नाही.याची आपण सर्वांनीच काळजी घ्यावयाची आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . दिलीप पाटोळे यांनी त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.
यापत्रकार परिषदेस आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ.पाटोळे, यांनी पुढे सांगितले की,पल्स पोलिओ मोहिम अधिक प्रभावीपणे राबविता यावी यासाठी ग्रामिण भागातील 3 लाख 76 हजार 894 बालकांना लस देण्यासाठी 2 हजार 431 बुथ उभारण्यात येणार आहे. शिवाय 198 मोबाईल टिम,भुसावळ रेल्वे स्टेशनवर 01 नाईट टिम,159 ट्रँझिस्ट टिम नियुक्त करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी भागातील बालकांसाठी बुथ शिवाय दुसऱ्या दिवसांपासून घरोघरी जावून लस देण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोळे यांनी सांगितले.