<
जळगाव-जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जिल्हयातील शेतक-यांना दुभत्या जनावरांना त्यांचा नैसर्गीक आहार म्हणून हिरवा चाऱ्यासाठीचे न्युट्रिफिड बियाणे 100 टक्के अनुदावर उपलब्ध देण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या दुभत्या जनावरांसाठी हिरवा चाऱ्यांच्या बियाणे उपलब्धतेसाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक कृषी अधिकारी , जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.