<
जळगाव-(प्रतिनिधी) – कानळदा येथील ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा येथे निलेश बॉक्सिंग क्लब व जळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन संस्थेतर्फे “मिनी मॅरेथॉन” स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रविण भंगाळे, जळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे प्रमुख श्री. राजेश जाधव, क्रीडा अधिकारी श्री.एम. के. पाटील, श्री.प्रमोद चव्हाण, निलेश बॉक्सिंग क्लब प्रमुख श्री.निलेश बाविस्कर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.के.पी. चव्हाण, उपमुख्याध्यापक श्री.के.एम.विसावे, क्रीडाशिक्षक श्री. आर.एन. पाटील, श्री.एस.एम. चव्हाण यांच्या शुभहस्ते स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, जेष्ठ शिक्षिका सौ.जे.एन. पाटील, सौ.जे. डी. पवार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मिनी मॅरेथॉन स्पर्धेच्या 3 km. धावण्याच्या स्पर्धेत 8 वी,9 वी व 10 वीतील 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत अनुक्रमे प्रथम-राहुल बारेला, द्वितीय-घनशाम सपकाळे, तृतीय-विशाल जाधव, चौथा-जयेश धनगर, पाचवा-किरण सोनवणे, सहावा-नरेंद्र सपकाळे या विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सुरुवातीला उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी संगीत शिक्षक श्री. जी. एम. सपकाळे व त्यांच्या चमूने इशस्तवन व स्वागतगीत सादर केले.या कार्यक्रमात प्रस्तावना व सूत्रसंचालन श्रीम. व्ही. जे. पवार व आभार श्री.एम.जे. पाटील यांनी मानले. या स्पर्धेला निलेश बॉक्सिंग क्लबचे सदस्य, गावातील ग्रामस्थ, प्राथमिक आरोग्यकेंद्र, व पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले.