विद्यार्थ्यांनी दाखविले विविध कलागुण
जळगांव(प्रतिनीधी)- श्री समर्थ बालक मंदिर, श्री समर्थ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल आव्हाने शिवार या शाळांचे कलादर्पन २०१९-२० वार्षिक स्नेहसंमेलन शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील शिक्षकांनी गेल्या महिन्याभरापासून मोठया मेहनतीतून हा कार्यक्रम साकार केला. विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपले कला गुण सादर करत प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील व उद्घाटक चोपडा मतदार संघाचे आ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड, कृउबा सभापती कैलास चौधरी, पं.स. सभापती नंदु पाटील, पं.स. सदस्य हर्षल चौधरी, जि.प. प्राथ.माध्य. शिक्षणाधिकारी बि.जे. पाटील, नुतन मराठा महाविद्यालय प्राचार्य एल.पी. देशमुख, लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर, संस्था तथा ग.स.अध्यक्ष मनोज पाटील, मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख, संस्थेचे सचिव ज्योतीमाई पाटील, संस्थेचे संचालक रविंद्र पाटील, कु. प्रतिक्षा पाटील आदी पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी उपस्थित होते. या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन बालकांच्या विविध कलापूर्ण आविष्कारांनी आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी संस्मरणीय ठरले. यामध्ये स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, पाणी आडवा पाणी जिरवा या विषयावर विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील केले. याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवित वाहवा मिळविली. याप्रसंगी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून या बालकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी नयनरम्य कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र साळुंखे व शितल अहिरे यांनी केले तर आभार प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, संगिता देशमुख यांच्यासह शिक्षक चैताली पाटील, जयश्री पाटील, सद्दाम तडवी, राहुल पाटील, आश्विनी पाटील, स्वाती भिरुड, शुभांगी गजरे, प्रज्ञा बाविस्कर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.