<
जळगाव(प्रतिनिधि):- संपूर्ण देशातून पल्स पोलिओ या रोगाचा नायनाट करून देशाला पल्स पोलिओ मुक्त करावा या उद्देशाने पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन शासनाद्वारे करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर प्रगती विद्यामंदिर शाळेतर्फे पल्स पोलिओ रॅलीचे आयोजन व नियोजन मुख्याध्यापक शोभा फेगडे व शिक्षक मनोज भालेराव यांनी केले. यात विद्यार्थ्यांनी ‘लस दया बाळा,पोलिओ टाळा, एक बून्द जिंदगी के, 19 जानेवारी ला काय आहे, पल्स पोलिओ मोहीम आहे. लहान बाळ पल्स पोलिओ केंद्रावर,जीवन फुलेल जीवनभर अशा विविध घोषणा देऊन सामाजिक बांधीलकी जपत जनजागृति रॅलीद्वारा सामाजिक संदेश दिला.
या प्रसंगी मुख्याध्यापिका ज्योति कुलकर्णी छात्राध्यापिका धन्वंतरी सोनवणे,पूजा तायडे, शिक्षकेतर कर्मचारी विजय चव्हाण यांनी परिश्रम घेतले.