<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथिल धनाजी नान चौधरी विद्याप्रबोधिनीच्या रजत महोत्सवाच्या निमित्ताने आयेजित आणि कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित राष्ट्रीय परिषदचे आयोजन करण्यात आले होते.
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने शाश्वत ग्रामीण आणि आदिवासी प्रश्न आणि आव्हाने तसेच केमिकल्स सायन्यमधील उद्योन्मुख प्रवाह या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी होतेतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. पी. पी. माहुलीकर यांचे शुभहस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. अजित पाटणकर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुनिल पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे लाईफ सायन्स विभागाचे डॉ. एस. टी. बेंद्रे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्या श्रीमती रत्नमाला बेंद्रे, औरंगाबाद विद्यापीठाच्या डॉ. पवार, समाजकार्य अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. विनोद रायपुरे तसेच विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. जी. महाजन राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. शाम सोनवणे, डॉ. मिलिंद काळे, समन्वयक डॉ. योगेश महाजन, सहसमन्वयक प्रा. निलेश चौधरी, प्रा. डॉ. लोखंडे व्यासपिठावर उपस्थित होते.
राष्ट्रीय परिषदेच्या विषयानुरूप अतिशय सुरेख अशी रांगोळी महाविद्यालयातील विद्यार्थींनी पुनम पाटील व भारती पवार यांनी साकारली त्यांचे आमंत्रित पाहुण्यांनी खुप कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला कर्मयोगी धनाजी नाना चौधरी आणि माजी विधानसभा अध्यक्ष लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन दीवप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन करण्यात आले.
प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी संस्थेच्या गेल्या 25 वर्षाची वाटचाल विषद करतांना विविध उदाहरणांवर संस्थेच्या प्रगती विषयक घडामोडींवर माहीती दिली. विज्ञान आणि समाजकार्य यांची जोड देवून संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाल्याचे सांगितले.
उद्घाटकिय मनोगत व्यक्त करतांना प्र. कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर यांनी विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यांची एकत्रित राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ही भविष्य वाटचाली करीता एक चांगली सुरूवात असून त्यातुन नक्कीच ग्रामीण व आदीवासी समुदायाचे प्रश्न व आव्हानांना सोडविता येईल असे प्रतिपादन करून राष्ट्रीय परिषदेस सुभेच्छा दिल्या.
अध्यक्षिय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांनी संस्थेच्या वाटचाली साठी प्रेरणास्त्रोत लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या समाज बाधंणीच्या स्वप्नातून विज्ञान आणि तंत्रज्ञानची जोड देवून सामाजिक विकास साधने शक्य होण्यासाठी संस्था अग्रेसर व प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
बिज भाषण करतांना डॉ. अजित पाटणकर यांनी आदिवासी ग्रामीण विकास साधतांना शब्दार्थ, कर्मार्थ, भावार्थ आणि ज्ञानार्थाची त्रिसुत्री महत्वाची असल्याची सांगतांना भाषा ही अत्यंत महत्वाची आहे. भाषा ही पोट भरण्याची, संशोधनाची आणि लोकउपयोगितेची असावी. संशोधन हे समाजउपयोगी झाले पाहीजे केवळ पीएच.डी करून संशोधनाची गरज पुर्ण होत नाही तर पीएच.डीचा उपयोग समाजासाठी झाला तर ते संशोधन महत्वाचे असेल असे त्यांनी सांगितले. शिक्षणाची ध्येय सांगतांना काय कसे आणि का हा विचार सुरु झाला की कार्यमग्नता, भावना, प्रेरणा व त्यातुन कामातील गुणात्मकता प्रदान होते व व्यक्तिमत्व विकसित होते असे प्रतिपादन केले.
दुसरे व्याख्याते कृषी विज्ञान केंद्र पाल येथील माजी प्रमुख संशोधक प्रा. सुधीर चौधरी यांनी आदीवासी व ग्रामीण विकासासाठीचे सर्वाकृष्ट प्रारूप म्हणजे सर्वोदय प्रारूप आहे असे सांगतांना महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण होण्या विषयी प्रयत्न करण्याची गरज असल्याचीही त्यांनी सांगितले.
ग्रामीण व आदीवासी प्रश्न आणि आव्हाने या राष्ट्रीय परिषदे करीता देशभरातुन 92 संशोधन शोध निबंध प्राप्त झाले सदर संशोधन शोधनिबंधाचे Jourmal Of Research and Development प्रसिद्ध करण्यात आले. यानंतर पेपर सादरीकरण्याच्या सत्रातुन जवळपास 25 संशोधकांनी आपले शोध निबंध सादर केले. या प्रसंगी डॉ. विनोद रायपुरे अध्यक्ष पद म्हणुन भुमिका निभावली.
समारोपाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रमोद पवार होते. त्यांच्या समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. जी. महाजन उपस्थित होते. याप्रसंगी संशोधकांना व उपस्थित सहभागींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रमोद पवार यांनी समाजकार्य महाविद्यालय हे समाजासमोर रोल मॉडेल म्हणुन पुढे येतील अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. वाय. जी. महाजन यांनी उपस्थितांना राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वितेसाठी सादर झालेल्या शोधनिबंधाचा उपयोग निश्चितच शाश्वत ग्रामीण व आदीवासी विकासासाठी होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. कल्पना भारंबे यांनी आभार प्रदर्शन सहसमन्वयक प्रा. निलेश चौधरी यांनी केले. राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.