<
जळगाव : संक्रांतीच्या शुभपर्वावर सुधर्माच्या वतीने जळगाव येथील बालनिरीक्षण गृहातील मुलांसाठी सुधर्माने ” संस्कारगोष्टी ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या सुरवातीलाच रिमांड होम मधिल ज्ञानेश्वर कासार या ८वीतील मुलाने ” हंबरुन वासराला चाटते जवा गाय , तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय ” ही र्हृ्दयस्पर्शी कविता म्हटली.
ज्ञानेश्वराला आई नाही. त्यामुळे सर्वांनाच त्याच्या आवाजातील आर्तता जाणवली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम्.आय.डी.सी. पोलिस पोलिस स्टेशन निरीक्षक श्री.रणजीत
शिरसाठ साहेब यांचे स्वागत सुधर्माच्या प्रथे
प्रेमाने गीतेची प्रत व गुलाब पुष्प देऊन सुधर्मा
अध्यक्ष श्री.हेमंत बेलसरे यांनी केले.
श्री. सिरसाठ साहेब यांचे हस्ते आईची सुंदर कविता सादर केल्याबद्दल ज्ञानेश्वर कासार या
अनाथ विद्यार्थ्याला ‘मनाचे श्लोक’ हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमा सुरवातीला
श्री.हेमंत बेलसरे यांनी मुलांना वासूदेव बळवंत फडके यांची इंग्रज सरकार विरूद्ध दाखवलेलेे शौर्य याची कथा सांगितली.तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्या- साठी भोगलेल्या काळ्यापाण्याची शिक्षा, तसेच जहाजातून समुद्रात मारलेली उडी ही सर्व गोष्टी रूपाने सांगितले.त्यांनी लिहीलेले अजरामर गीत “सागरा प्राण तळमळला” हे म्हणून दाखवले. या देशभक्तीच्या कथा ऐकताना मुले मंत्रमुग्ध झाली.
तसेच सुदामा कृष्णाची कथा,शबरीच्या भक्तीची कथा,अगस्ती ऋषीची गोष्ट इ.गोष्टी मुलांना सांगितल्या. पी.आय. श्री.रणजित शिरसाठ यांनी मुलांशी दिलखुलास संवाद साधला. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, त्याविषयीचे कायदे याची सविस्तर माहिती मुलींना दिली. यापासून सावध राहण्याचे आवाहनही केले. कायदा तुमच्यासाठीच आहे,कुठलिही अडचण असेल तर सांगा असे सांगितले. तसेच सुधर्मा संस्थेच्या
“संस्कारगोष्टी” या उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार रिमांड होम अधिक्षीका सौ.जयश्री पाटील यांनी मानले.हा गोष्टींचा कार्यक्रम संपूच नये असे मुलांना वाटत होते.शेवटी मुलांना तिळगुळाचे व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. मुलांना खुप चांगले नागरिक बना,शिकून मोठे व्हा अशा शुभेच्छा सुधर्माच्या वतीने देण्यात आल्या. या कार्यक्रमात श्री.सुनिलदादा चव्हाण,
श्री.राजेंद्र चौधरी सर श्री.दिनकर बाविस्कर, श्री.नानासाहेब चव्हाण व ऋचा बेलसरे या सुधर्माच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.