<
जळगाव : येथील मेहरूण परिसरातील श्रद्धेय श्री साईबाबा मंदिराच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त “दरबार साईचा” हा सुश्राव्य संगीतमय भक्तिगीतांचा कार्यक्रम दि. २३ ते २५ जानेवारीदरम्यान घेतला जाणार आहे. भाविकांनी तीन दिवस उपस्थिती द्यावी, असे आवाहन साई परिवाराने केले आहे. बीड येथील साईगोपाल देशमुख हे संध्याकाळी ७ वाजता सहकाऱ्यांसह कार्यक्रम सादर करणार आहे. यावेळी साईबाबांच्या भक्तीचा जागर केला जाणार आहे. मेहरूण परिसरातील प्रसिद्ध साईबाबा मंदिराने एक तप पूर्ण केले असून तेरावा वर्धापनदिन मेहरूणचे ग्रामस्थ साजरा करणार आहेत. शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या हस्ते साई पालखी पूजन असून त्यानंतर लघुरुद्रभिषेक केला जाणार आहे. दुपारी महाप्रसाद वाटप केला जाईल. यावेळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, राज्यमंत्री दर्जा प्राप्त गुरुमुख जगवाणी, आ.सुरेश भोळे, आयुक्त उदय टेकाळे, मनपाचे मुख्य लेखापरीक्षक संतोष वाहुळे यांचेसह मेहरूणच्या वोर्डातील चारही नगरसेवक विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, जयश्री महाजन, शबानाबी सादिक खाटिक उपस्थित राहतील. भाविकांनी कार्यक्रमाला व महाप्रसादाला उपस्थिती द्यावी असे आवाहन साई परिवारासह मेहरूण येथील ग्रामस्थांनी केले आहे.