<
नागपूर संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद
नागपूर-(प्रतिनीधी) – महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सांघिक संघाने (भांडुप , रत्नागिरी परिमंडल) सर्वच खेळप्रकारात वर्चस्व गाजवून सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळविला. महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांच्याहस्ते विजेत्या संघाला करंडक प्रदान करण्यात आला. यजमान नागपूर (गोंदिया- चंद्रपूर) संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद जाहीर करण्यात आले.
रवी नगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर रविवार (दि.19) ला तीन दिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. सर्वाधिक 80 गुण मिळविणाऱ्या सांघिक कार्यालयाल(भांडुप ,रत्नागिरी परिमंडल) संघाने संघाने सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक पटकाविला. यावेळी इतर संघ व उपस्थितांनी सुद्धा टाळ्यांचा गजर व जल्लोष करीत विजेत्या संघांचे कौतुक केले.
खेळ भावनेने सर्वानी काम करावे यामुळे आपली आणि महावितरण कंपनीची प्रतिमा उंचावेल या शब्दात महावितरणचे संचालक(प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी नागपूर येथे आयोजित महावितरण आंतर परिमंडल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले. व्यासपीठावर महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे, प्रसाद रेशमे, अरविंद भादीकर, कल्याण परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, पुणे परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे, मुख्य अभियंता सर्वश्री सचिन तालेवार, सुखदेव शेरकर, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, आनंद रायदुर्ग, भुजंग खंदारे, अनिल भोसले, महाव्यस्थापक राजेंद्र पांडे, मुख्य औदयोगिक संबंध अधिकारी संजय ढोके , सह मुख्य औदयोगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, प्रभारी मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी नंदागवळी व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यातील 16 परिमंडलाचे औरंगाबाद (जळगाव), लातूर (नांदेड), कल्याण (नाशिक), सांघिक कार्यालय (भांडूप व रत्नागिरी), नागपूर (चंद्पूर व गोंदिया), अकोला (अमरावती), पुणे (बारामती) व कोल्हापूर अशा 8 संयुक्त संघांतील 688 पुरुष व 376 महिला असे एकूण -1,064 खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेतील विविध सामन्यांचे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे.
सांघिक खेळांचे अंतिम निकाल – अनुक्रमे विजेता व उपविजेता : क्रिकेट – नागपूर व कल्याण संयुक्त विजेते, व्हॉलिबॉल – कोल्हापूर व नागपूरसंघ, कबड्डी – सांघिक कार्यालय व कोल्हापूर संघ, बॅडमिंटन (पुरुष गट) – सांघिक व लातूर , बॅडमिंटन (महिला गट) – नागपूर व पुणे, 4 बाय 100 रिले – पुरुष गट- कोल्हापूर व पुणे , महिला गट – सांघिक व नागपूर
वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (कंसात संघ) –अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे – 100 मीटर धावणे – पुरुष गट – 1) गुलाबसिंग वसावे (पुणे) व प्रदीप वंजारी (कोल्हापूर) , महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय) व नम्रता राजपूत (कल्याण), 200 मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे) व प्रदीप वंजारी (कोल्हापूर), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक ) व सरिता सोरटे (नागपूर ),400 मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे व विराज कोठमकर (सांघिक), महिला गट – श्वेता अंबादे (नागपूर ) व अर्चना भोंगे (पुणे ),800 मीटर धावणे – पुरुष गट – प्रतीक वाईकर – (पुणे ) व शुभम मात्रे (अकोला ), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय व पूजा ऐनापुरे (कोल्हापूर ), उंच उडी – पुरुष गट – चेतन केदार (औरंगाबाद ) व जाकीर शेख (लातूर ), महिला गट – सरिता सोरटे (नागपूर ) व अश्विनी देसाई – (कोल्हापूर ),लांब उडी – पुरुष गट – चेतन केदार (औरंगाबाद ) व शुभम निंभाळकर (कोल्हापूर ), महिला गट – सरिता सोरटे (नागपूर ) व प्रिया पाटील (सांघिक कार्यालय ), गोळा फेक – पुरुष गट-प्रवीण बोरवाके (पुणे ) व इम्रान मुजाम (कोल्हापूर) , महिला गट -पूजा अन्नापुरे (कोल्हापूर ) व हर्षला मोरे (कल्याण ), थाळी फेक – पुरुष गट – धर्मेंद्र पाटील(औरंगाबाद ) व इम्रान मुजावर -(कोल्हापूर ), महिला गट – हिना कर्णे (पुणे ) व पूजा ऐनापुरे (कोल्हापूर ), भाला फेक – पुरुष गट – सचिन चव्हाण (कोल्हापूर) व अनिकेत दिवेकर (पुणे ), महिला गट – अश्विनी जाधव (पुणे ) व मेघा राठोड(अकोला) (नागपूर), बॅडमिंटन – पुरुष एकेरी – भरत वशिष्ठ (पुणे ) व पंकज पाठक (लातूर) , पुरुष दुहेरी – पंकज पाठक – दीपक नाईकवाडे (लातूर ) व शरद भोसले –किशोर दाभेकर (अमरावती ), महिला एकेरी – वैष्णवी गंगारकर वरितिका नायडू (नागपूर ), महिला दुहेरी – प्रियांका उगले – तेजश्री गायकवाड (सांघिक ) व निशा पाटील कमलरूख दारुखानवाला (पुणे ), बुध्दीबळ – पुरुष गट – दत्तात्रय ठाकूर (लातूर ) व निलेश बनकर (नागपूर) , महिला गट – ऋतुजा तारे (पुणे ) व अमृता जोशी (सांघिक कार्यालय ) टेनिक्वाईट – महिला एकेरी – प्रियंका उगले (सांघिक कार्यालय ) – शितल नाईक (पुणे), महिला दुहेरी – प्रिया पाटील व सायली कांबळे (-सांघिक कार्यालय ) व समिधा लोहारे व यामिनी जांभुळे (नागपूर),कुस्ती – 57 किलो – आकाश लिंभोरे (पुणे ) व गोरखनाथ राणगे (कोल्हापूर ), 61 किलो – विनोद गायकवाड (अमरावती ) व सुखदेव पुजारी (कोल्हापूर ), 65 किलो – राजकुमार काळे (पुणे ) व गुरुप्रसाद देसाई (लातूर ), 70 किलो – महादेव दहिफळे (लातूर ), शिवाजी कोळी (कोल्हापूर ), 74 किलो – ज्योतिबा औकलकर (कोल्हापूर ), व नितीन मांडले (पुणे) , 79 किलो -युवराज निकम (कोल्हापूर ) व निलेश भगत (कल्याण ), 86 किलो – संदीप सावंत -(कोल्हापूर ) व महेंद्र कोसरे (नागपूर ), 92 किलो – तुषार वारके (कोल्हापूर ) व हासिउद्दिन शेख (अमरावती ), 97 किलो – महेश कोळी (पुणे ) व संतोष गीते (लातूर ) आणि 125 किलो (खुला गट )– हुनुमंत कदम – (कोल्हापूर ) व गणेश भोकरे (पुणे ). टेबल टेनिस -(पुरुष) -नागपूर व कोल्हापूर, टेबल टेनिस -(महिला ) -अकोला व लातूर
टेबल टेनिस – पुरुष एकेरी – रितेश सव्वालाखे (नागपूर ) व शकील शेख (कोल्हापूर ), पुरुष दुहेरी – रितेश सव्वालाखे व प्रमोद मेश्राम (नागपूर) -एम .पी . प्रजापती व विवेक सबसे (कल्याण), महिला एकेरी – -स्नेहल बढे (अकोला)- प्रियंका आसूलवार (लातूर) ,महिला दुहेरी -पल्लवी वाकोडीकर व अश्विनी शिंदे (सांघिक कार्यालय) – अमृता गुरव व अपर्णा महाडिक (कोल्हापूर), ) कॅरम – पुरुष एकेरी – अनंत गायत्री (सांघिक कार्यालय) व अंकित भैसारे (नागपूर ), पुरुष दुहेरी – सचिन शेंडगे व सचिन कांबळे (पुणे) – अनंत गायत्री व विनोद गोसावी (सांघिक कार्यालय) , महिला एकेरी – पुष्पलता हेडाऊ ( नागपूर) व तेजश्री गायकवाड (सांघिक कार्यालय) , महिला दुहेरी – पुष्पलता हेडाऊ व सीमा धुर्वे ( नागपूर) व तेजश्री गायकवाड व प्रियंका उगले (सांघिक कार्यालय),ब्रिज– (प्रेअर प्रोग्रेसिव ) पंकज आखडे व महेश मेश्राम (नागपूर) – ललितादास देशपांडे व नामदेव पुसने.