<
13 फेब्रुवारीपर्यंत करता येणार पडताळणी
जळगाव-(जिमाका) :- मा. भारत निडणुक आयोगाचे निर्देशानुसार मतदार यादी अद्यावत व शुध्द होण्याच्या हेतुने मतदार पडताळणीसाठीचा कार्यक्रम (EVP) जिल्ह्यात 11 नोव्हेंबर, 2019 ते दिनांक 13 फेब्रुवारी, 2020 या कालावधित राबविण्यात येत आहे. त्यानुसार मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नावाची पडताळणी वोटर हेल्पलाईन (Voter Helpline) मोबाईल ॲप, राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP), सामायिक सेवा केंद्र (CSC) ला भेट देवुन, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाशी संलग्न मतदार सुविधा केंद्रास भेट देवून करता येणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील मतदारांनी घ्यावा. असे आवाहन डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.