<
जळगाव – लघुउद्याेग भारती महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने वर्ल्ड ट्रेड सेंटरतर्फे (मुंबई) जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्याेजकांनी उत्पादित वस्तू विकण्यासाठी व प्रशिक्षित करण्यासाठी १० जुलै राेजी दुपारी २.३० वाजता मार्गदर्शन व चर्चासत्र अायाेजित केले अाहे.
चर्चासत्रात अांतरराष्ट्रीय व्यापार, अांतरराष्ट्रीय विपणन धाेरणाचे महत्त्व, जागतिक दर्जाचे मानदंड स्वीकारणे, परकीय व्यापार धाेरण, निर्यात खर्च व किंमत या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार अाहे, असे जिल्हा उद्याेग केंद्र जळगाव यांनी कळवले अाहे.