जळगाव – (प्रतिनिधी) – येथील विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती माध्यमिक शाळेत सुभाष चंद्र बोस यांची 123 वी जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रगती माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील यांनी भूषविले.
सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर सविस्तर माहिती श्री सुभाष संतोष शिरसाठ सर यांनी विद्यार्थ्यांना दिली.
तसेच श्री दीपक बारी सर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन चरित्र व कार्याबाबत माहिती दिली.
व्यासपीठावर सौ मनीषा पाटील, सौ भाग्यश्री तळेले, सौ सुवर्णा पाटील, व तडवी मिस, आणि श्री अनिल वाघ, श्री दीपक बारी, श्री सुभाष शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक बारी यांनी केले.