<
जळगाव : पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे ब्रिटीश डेप्युटी हाय कमिशन, मुंबईच्या सहकार्याने कोथरूड येथे यंग थिंकर्स परिषद दि. २५ जानेवारी रोजी संपन्न होत असून त्याकरिता जळगावातून तरुण सहभागी होत आहेत. हि परिषद कृत्रिम बुद्धीमत्ता, तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल या थीमवर आयोजित आहे. परिषदेत एजी अनालिटीक्स कंपनीचे संस्थापक अर्घ्य गांगुली, उद्योजक संजय पोद्दार, सोफ्टवेअर कंपनीच्या वैशाली निओतिया, टेक महिंद्राचे अधिकारी जगदीश मित्र हे उपस्थित युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य, कौशल्य, नितीमत्ता, ऑनलाईन सामग्री या चार प्रमुख विषयाभोवती हि परिषद असून यात आंतरराष्ट्रीय संबंध, स्वायत्तता, आयुष्य, आदींवर उहापोह केला जाईल. याकरिता जळगावातील विराज कावडीया, अमित जगताप हे युवक सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.