<
जळगाव(प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिरातील इयत्ता पहिली ते चौथी चे विद्यार्थी रोज प्रार्थना म्हणते वेळी संविधानाची उद्देशिकेचे वाचन करतात, तसेच या विद्यार्थ्यांची उद्देशिका ही तोंडपाठ आहे. विस्कळीत व विखुरलेल्या देशास स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्री त बांधण्याचे काम संविधान करते. विद्यार्थ्यांना बालवयातच संविधानाचे महत्व समजावे म्हणून हा उपक्रम राबविला जातो. संस्थेचे तथा ग. स. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने, नीलिमा भारंबे, उज्वला ब्राम्हणकर, सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे, सुदर्शन पाटील, मयुर कणखर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.