<
जळगाव-(प्रतिनिधी) – विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चाललेल्या प्रगती माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या पैलूवर उद्बबोधन वर्ग घेण्यात आला.
‘शाळा’ हे समाज विकासाचे ‘केंद्र ‘. विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू असतो. या केंद्रबिंदू चा शाळेत सामाजिक, भावनिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होत असल्याने आपल्या शाळेचा विद्यार्थी हा स्वयंपूर्ण असला पाहिजे. त्याचा सर्वांगिन विकास झाला असला पाहिजे. विद्यार्थी हा सर्वार्थाने स्वयंपूर्ण व परिपूर्ण असला पाहिजे त्याचे आरोग्य निरोगी असले पाहिजे. त्याने स्वच्छता पाळली पाहिजे. विद्यार्थी हा स्वच्छतेचा पाईक असला पाहिजे. याकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा पाटील यांनी उदबोधन वर्गाचे चे आयोजन करण्याचे ठरविले व त्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या या उपक्रमाने प्रेरित होऊन व प्रभावित होऊन मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व विद्यार्थ्यांची मनमोकळेपणाने चर्चा करून हितगूज केले.
तसेच विविध विषयांच्या अनुषंगाने शिक्षकांशी चर्चा करून विषयांशी अनुसरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे सुचविले. विषय शिक्षकांनी देखील आपल्या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शारीरिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आजचा विद्यार्थी हा भारताचा उद्याचा भावी नागरिक आहे.वहा भावी नागरिक शारीरिक दृष्ट्या सक्षम व सुदृढ तसेच निरोगी राहायला पाहिजे म्हणून त्याच्या आरोग्य शारीरिक दृष्ट्या सुदृढ राहणे कामी विद्यार्थ्याने आपले आरोग्य चांगले राहिले पाहिजे .शरीर सुदृढ व बलवान राहिले पाहिजे. याकामी विद्यार्थ्याने व्यायाम केला पाहिजे .योगासने केली पाहिजे. असे मार्गदर्शन श्री श्री सुभाष शिरसाट सर यांनी केले. तर स्काऊट गाईड या या विषयास अनुसरून विद्यार्थ्याने स्काऊटचे नियम अंगीकृत केले पाहिजे. विद्यार्थ्याने निसर्गप्रेमी असले पाहिजे. निसर्ग रक्षणाकरता व निसर्ग रक्षणाकरिता प्रत्येक व्यक्तीने व विद्यार्थ्याने प्रयत्न केले पाहिजे तसेच निसर्ग स्वच्छ व व परिसर स्वच्छ राखला पाहिजे याबाबत मार्मिक विचार श्री अनिल वाघ यांनी मांडले. हात स्वच्छ धुणे याबाबतची प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच विद्यार्थी निरोगी राहिला पाहिजे त्याचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे व्यसनापासून तो अलिप्त राहिला पाहिजे व्यसनाचे दूरगामी दुष्परिणाम याबाबत श्री दीपक बारी सर यांनी अनमोल मार्गदर्शन केले
विद्यार्थी हिताचे व कल्याणाचे उपक्रम माध्यमिक विभागात राबविले जातात याबाबत संस्थेचे चेअरमन श्री प्रेमचंद ओसवाल यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संस्थाध्यक्ष मंगलाताई दुनाखे यांनी सदिच्छा व शुभेच्छा या उपक्रमाबाबत पाठविल्या.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष शिरसाट यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अनिल वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षक- शिक्षिका अथक प्रयत्न केले.