<
जळगाव- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकूल योजना (ग्रामीण क्षेत्र) ची सभा संपन्न झाली. या सभेत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात रमाई घरकूल योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांपैकी 8 तालुक्यांतील 910 प्रस्तावांना सन 2019-2020 करिता मान्यता देण्यात आली आहे.
मान्यता देण्यात आलेले तालुकानिहाय पात्र प्रस्ताव याप्रमाणे- जळगाव- 52, पारोळा-180, चोपडा-106, रावेर-244, पाचोरा-29, चाळीसगाव-134, यावल-45, धरणगाव- 120 याप्रमाणे जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये एकूण 910 प्रस्ताव पात्र ठरले असल्याची माहिती योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.