<
जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :- जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत 20 ते 26 जानेवारी, 2020 या कालावधीत राष्ट्रीय बालिका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातंर्गत 24 जानेवारी रोजी बालिका दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेमध्ये स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.
सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रंसगी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि विधी सेवा प्राधिकरणाचे पदाधिकारी उपस्थित होते.