<
जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील भटक्या जमाती-क मधील धनगर समाजातील युवक युवतींना स्पर्धा परिक्षांमध्ये बसण्याचे प्रमाण इतर समाज घटकांच्या तुलनेत कमी आहे.आर्थिक परिस्थिती व स्पर्धा परिक्षांमध्ये लागणा-या भरमसाठ प्रवेश शुल्कामुळे त्यांना स्पर्धा परिक्षेत बसता येत नाही. त्यामुळे परिक्षांमध्ये बसण्यासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या युवक युवतींना परिक्षा शुल्कात आर्थिक सवलत देणेबाबतचा निर्णय शासनाने घेतला असून याबाबतची योजना कार्यान्वीत झालेली आहे.
धनगर समाजातील विद्यार्थ्यास/विद्यार्थीनीस पदवी अभ्यासक्रम किमान 60 टक्के गुणांसह उर्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही योजना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था “ महाज्येाती ” या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.