<
जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील भटक्या जमाती-क मधील धनगर समाजातील युवक, युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलिस भरतीसाठी आवश्यक ते प्रशिक्षण देणेबाबत योजना कार्यान्वीत झालेली आहे.
संबंधीत विद्यार्थ्यास/विद्यार्थीनीस पदवी अभ्यासक्रम किमान 60 टक्के गुणासह उर्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही योजना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था “ महाज्येाती ” या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक त्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.