<
जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) :- राज्यातील भटक्या जमाती-क मधील धनगर समाजातील विद्यार्थ्यांचे संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परिक्षांमध्ये उतीर्ण होण्याचे प्रमाण इतर समाज घटकांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा/महाराष्ट्र लेाकसेवा आयोगयांच्याकडून घेण्यात येणा-या स्पर्धा पूर्व परिक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देणेबाबतची योजना कार्यान्वीत झालेली आहे.
याचा लाभासाठी संबंधीत विद्यार्थ्यास/विद्यार्थीनीस पदवी अभ्यासक्रम किमान 60 टक्के गुणासह उर्तीर्ण होणे आवश्यक आहे. सदर योजना महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था “ महाज्येाती ” या संस्थेच्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक त्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असल्याची माहिती योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.