<
जळगाव-(प्रतिनिधी) – “घेई छंद मकरंद ..””सुरांनो चंद्र व्हा..अबीर गूलाल उधळत रंग..कानडा विठू माऊली अश्या नाट्यसंगीत,नाट्यगीत, ह्दयाला स्पर्श करणार्या रचना सादर करीत स्वर जुळूनी आले या बहारदार गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.तबला,पखवाज,बासरी यांच्या जुगलबंदीने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला..रसिकांच्या टाळ्यांच्या गजरात स्वरांनी अधिकच उंची गाठली.
के.सी.ई. सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वरदा संगीत विभाग व कान्ह ललित कला केंद्र आयोजित “स्वर आले जुळूनी”या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 23 रोजी मू.जे महाविद्यालयातील, जुना कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना उपस्थित संगीत कलाकारांच्या संगीतातून प्रेरणा मिळावी, या हेतूने या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे या नवोदित कलाकारांच्या संगीत मैफिलीचा आपण भरभरून आस्वाद घ्यावा असे विचार केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी मांडला. यावेळी व्यासपीठावर केसीई सोसायटीचे सदस्य डी. टी. पाटील, प्रमुख अतिथी म्हणून ऑटोनोमसचे इन्चार्ज डॉ. एस. एन.भारंबे ,जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. संदीप केदार, संगीत विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कपील शिंगाणे उपस्थित होते.
स.ना भारंबे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की, नवीन कलावंत उत्तमरित्या सादरीकरण करतात. प्रिया सायखेडे ही महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून ती सध्या बडोदा येथे संगीत विषयक शिक्षण घेत आहे, तिने स्वतःच्या कौशल्यावर ज्ञानावर जे काही मिळवले ते अगदी कौतुकास्पद आहे व ती आज आपल्याच महाविद्यालयात खुला कार्यक्रम करते आहे ही महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. दिपेश पटेल बडोदा, करण भंडारी अहमदाबाद, बासरी कौशल कुमार मुंबई, सारंगी नारायण प्रधान आमदाबाद,ऑक्टोपॅड पलाश जयस्वाल मुंबई, सिंथेसायझर स्वानंद देशमुख जळगाव, पखवाज गायक म्हणून लाभलेले प्रिया सायखेडे जळगाव व यश देवले ग्वाल्हेर यांचे स्वागत शशिकांत वडोदकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन ईशा वडोदकर यांनी तर प्रास्ताविक व आभार स्वरादा संगीत विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कपिल शिंगाणे यांनी केले.यावेळी मू. जे महाविद्यालयाचे सुभाष तळेले,देवेंद्र गुरव,हेमंत पाटील व स्वरदा संगीत विभागातील विद्यार्थी आदी उपस्थित होते.