<
मुक्ताईनगर(प्रतिनिधि):- जि. प. शाळा खामखेडे ता. मुक्ताईनगर येथे उचंदा केंद्रातील अकरा शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . या कार्यक्रमा अगोदर बाल आनंद मेळावा घेण्यात आला . त्याचा आनंद विद्यार्थी शिक्षक व पालकांनी घेतला . त्यानंतर अकरा शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत विविध गुण दर्शन केले. पालकांनी त्यांचे कौतूक केले. या प्रसंगी योगराज कन्स्ट्रक्शन चे श्री. विनोदभाऊ सोनवणे यांनी कार्यक्रमाला भेट दिली . त्यानी प्रत्येक शाळेला ट्राफि , मेडल व प्रमाणपत्र यासाठी योगदान दिले.
या कार्यक्रमात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री सुरेश रुपचंद सोनवणे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला . तसेच श्री जगताप सर यांच्या मुलीने मेडल मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . या प्रसंगी मुक्ताईनगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विश्वनाथ धनके व उचंदा केंद्राचे केंद्र प्रमुख श्री ठोसर दादा यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान खामखेडे येथील सरपंच सौ. वत्सलाताई सोनवणे यांनी भूषविले . या कार्यक्रमाला शाळा
व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रमेश गवते जि. प. सदस्य वैशालीताई तायडे पंचायत समिती सदस्य सौ. शुभांगीताई भोलाणे यांची उपस्थिती लाभली .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयवंत बोदडे . श्रीमती पल्लवी कळमकर , साहित्यिक अ. फ. भालेराव व श्री सुरेश बोरसे यांनी केले. आभार श्री ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले . या कार्यक्रमाच्या यशस्वी
तते साठी केंद्रातील शिक्षक श्री सदार श्री मोरेसर श्री ई ओ पाटील श्री खैरनार श्री बोरकर सर जगताप सर पवार वारके सर अडकमोल परखड मॅडम संगीता पाटील यांनी परिश्रम घेतले .