<
मतदान हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे सर्वानी मतदानाचा हक्क बजवावा- मनोज भालेराव यांचे आव्हान
जळगाव(प्रतिनिधि):- भारत निवडणूक आयोगमार्फत दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रिय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.वयाच्या २८ वर्ष पूर्ण केलेल्या युवक युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो.या अनुषंगाने मतदान जागृतीबाबत तरुणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जावा या उद्देशाने प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक तथा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मनोज भालेराव व शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांनी शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.तसेच मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मतदान कार्ड याविषयी मार्गदर्शन करून मतदान कार्ड मध्ये असलेल्या विशेषबाबी याविषयी माहिती देऊन मतदान करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती दिली.मुख्याध्यापक शोभा फेगडे यांनी मतदानाच्या अधिकारचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.या उपक्रमाचे कौतुक करताना संस्थेचे चेअरमेन तसेच अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी विद्यार्थ्यांना मतदान हक्क याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिक्षक संध्या अट्रावलकर ,रमेश ससाने,पंकज नन्नवरे, आदि उपस्थित होते.