<
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात “संशोधन एक अभ्यास” यावर मार्गदर्शन.
जळगाव दि. 25 -शिक्षक हा ज्ञानदान करणारा दिवा आहे, त्यांनी स्वतःला एखाद्या विषयात इतके निपूण बनवावे की त्या विषयावर तुमचा हातखंडा निर्माण झाला पाहिजे, विशेषतः संशोधन हा सर्व विषयांचा पाया असल्याने या विषयावर प्रभुत्व मिळवा, असे विचार मौलाना आजाद नँशनल विद्यापीठ (हैदराबाद) येथील प्राध्यापक मोहम्मद सिद्दीकी यांनी केले.केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गुरुवार 22 रोजी आयोजित “संशोधन एक अभ्यास” या मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हटले की, संशोधन कक्षातर्फे विविध विषयांवरील स्त्रोत संदर्भ निर्माण करणे गरजेचे आहे, संशोधन पेपर कसा तयार करावा याविषयी कलाने घेत उपस्थित प्राध्यापकांची त्यांनी संवाद साधला.यावेळी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रंजना सोनवणे, प्रा. डॉ. कुंदा बाविस्कर,प्रा. डॉ. शैलेजा भंगाळे, प्रा. डॉ. वंदना चौधरी, प्रा. डॉ. जयश्री पाटील,प्रा. डॉ. सुनिता नेमाडे, प्रा. केतन चौधरी, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. पंकज पाटील,प्रा.निलेश जोशी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे ग्रंथपाल मनीष वनकर, प्रा. रामलाल शिंगाने, जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.संदीप केदार प्रा. केतकी सोनार, प्रा. प्रशांत सोनवणे, प्रा. अभय सोनवणे, टेक्निकल हेड संजय जुमनाके आदी उपस्थित होते.