<
अमळनेर : शहरातील प्रभाग क्र.१ मध्ये नगसेवक नरेंद्र चौधरी यांनी स्वत: लाख रु. खर्च करून प्रभागात चार ठिकाणी तातडीचे जलकुंभ निर्माण केले असून संपूर्ण चोवीस तास हे जलकुंभ पाण्याने भरलेले राहत असल्याने टंचाई परिस्थितीत नागरिकांना वरदान ठरले आहे..
यंदाच्या उन्हाळ्यात नगसेवक नरेंद्र चौधरीं यांनी टंचाई परिस्थितीत केवळ न.पा. वर अवलंबून न राहता गाळ साचून बंद पडलेली पुरातन विहीर दीड लाख रु. स्वत: खर्च करून पुनर्जीवित केली, व येथून तीन टँकरद्वारे संपूर्ण प्रभागात नियमित पाणीपुरवठा केला. एवढे करूनही त्यांचे स्वत:चे समाधान होत नसल्याने सुमारे पाच हजार लिटरच्या चार नवीन टाक्या त्यांनी स्वत: लाख रुपये खर्च करून विकत घेतल्या आणि तातडीची योजना म्हणून प्रभागात चार ठिकाणी या टाक्या ठेवल्या, व या टाक्या टँकरद्वारे नियमित भरून नागरिकांच्या उपयोगी आणल्या. विशेष म्हणजे या टाक्या संपूर्ण चोवीस तास भरलेल्या राहत असल्याने नागरिकाना वाटेल तेव्हा पाणी उपलब्ध होत आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक गल्लीत नियोजनाप्रमाणे टँकरदेखील येत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात हा प्रभाग टंचाईच्या त्रासापासून दूरच राहिला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जलदूत ठरलेले नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचे विशेष कौतुक सर्वत्र होत आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर हे जलकुंभ सुरक्षित ठेऊन ज्या ज्या वेळी टंचाई परिस्थिती येईल त्यावेळी उपयोगात आणण्यात येईल, अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे.
–