<
मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- भारताची आर्थिक स्थिती आलबेल नाही आर्थिक नादारीत देश असताना. आर्थिक अत्यावश्यक उपाययोजना सोडून भारतात नागरिकांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा व नागरिकत्व नोंदणी कायदा लागू करण्यात आलेला आहे, सदरचा कायदा फक्त मुस्लिम बांधवांना प्रभावित करणारा नसून ओबीसी, एस सी, एस टी, भटके विमुक्त अशा ४० टक्के हिंदू बांधवांना बाधित करणारा आहे. या कायद्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २४ रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने आज रोजी मुक्ताईनगर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी आज आप आपले दुकाने सकाळ पासून दुपारपर्यंत बंद ठेवून बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सहकार्य केले. बंद शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व व्यापारी बांधव यांनी योग्य सहकार्य केले त्याबद्दल व्यापारी व प्रशासन यांचे आभार वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मानले. बंद यशस्वी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अँड विनोद इंगळे, संतोषदादा बोदडे, अँड. राहुल पाटील, रविंद्र बोदडे, राजू बोदडे, नंदू वाघ, माणिकराव इंगळे, अमोल बोदडे, किरण सावकारे, वसीम मन्सूरी, विश्वनाथ गणेश, विजय बोदडे, शे.मुशीर, आनंदा वाघ, अशोक वाघ, गणेश इंगळे, पुना इंगळे, निलेश भालेराव, पंकज चोपडे, रमेश वानखेडे, विशाल वाघ, मनोज धुरंधर,अँड दीपेश वानखेडे आदींनी सहकार्य केलं. या बंद मध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी उपस्थिती देऊन आपला NRC CAA व NPR ला विरोध नोंदवला यात अल हिरा संघटनेचे शकुर जमादार, सलीम खान, जाफर अली, शकील मेंबर, रफिक सलाम, असिफ टेलर, मुशीर मण्यार, भिकन सांडू, हारून भाई, काँग्रेसचे आत्माराम जाधव, बी डी गवई, आसिफ खान इस्माईल खान, मोहम्मद असिफ खान, व भारत मुक्ती मोर्च्यांचे नितीन गाढे, प्रमोद सौधळे आदींनी उपस्थिती देऊन पाठिंबा देऊ बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी केला.