<
जामनेर_(प्रतिनीधी) – सकाळी गावातून प्रभात फेरी काढून प्रजासत्ताक दिनाच्या,’झाडे लावा झाडे जगवा’,’मुलगी शिकवा ,मुलगी वाचवा’, ‘पाणी आडवा ,पाणी जिरवा’,घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.त्यानंतर ग्रामपंचायत व शाळेत ध्वजा रोहणापूर्वी ‘संविधान प्रस्तावणावेचे वाचन’ सारथी संस्थेचे तारादूत
गणेश म्हस्के ,ग्रामसेवीका महाजन मॅडम, शिक्षक वृंद यांनी सामूहिक पद्धतीने म्हणवून घेतले. ग्रामपंचायत येथे मा.जि.प.सदस्य श्री.समाधान पाटील व शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.ईश्वर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत देशभक्तीपर गीत ,नृत्य,भाषणे, गायन केले .यावेळी कार्यक्रमाचे प्रस्थाविक अमोल पाटील सर यांनी केले.कार्यक्रमासाठी मुख्यध्यापिका श्रीमती मनीषा रोझतकर मॅडम,भुपेंद्र अहिरे सर,नागनाथ खांडेकर सर,देवानंद पाटील सर यांनी सहकार्य केले व जगदीश शेळके सर यांनी आभार व्यक्त केले.