Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे 6 फेब्रुवारी रोजी होणार वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे 6 फेब्रुवारी रोजी होणार वाटप

पत्रकार दिन व रस्ता सुरक्षा अभियान  2020 निमित्त स्तुत्य उपक्रम : 476पत्रकारांनी केली नोंदणी

जळगाव-(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय जळगाव तथा नजर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 6 फेब्रुवारी 2020 रोजी  पत्रकार दिनाचे व रस्ता सुरक्षा अभियानाचे  औचित्य साधत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवाना हेल्मेट वाटप  करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे ठीक 1:30 वा.सुरु होईल.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे हे असणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून आ.किशोरअप्पा पाटील, आ.राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, दैनिक लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी,  प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे  हे असणार आहे. त्याच बरोबर मुकुंद बिलधीकर, प्रविणसिंग पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संजय कुमावत, गोविंद शिरोळे, प्रदीप शांताराम पाटील, व्यंकटेशअण्णा कलाल, पत्रकार संघांचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे याची उपस्थित राहणार आहे.पत्रकारांनी कार्यक्रमाला येतांना आपल्या वृत्तपत्र संस्थेचे ओळखपत्र सोबत आणावे.आल्यावर पुन्हा सभागृह स्थळी आपले नाव नोंदणी करून आयोजक यांच्या कडून कुपन घ्यावे.त्यानंतरच हेल्मेट वाटप होईल.कार्यक्रम पत्रकार बांधवांसाठी असून सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून सहकार्य करावे असे अवाहन पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, वृत्त वाहिनी विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, वृत्त वाहिनी विभाग कार्यध्यक्ष संतोष ढिवरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण कार्यध्यक्ष  भगवान मराठे, जिल्हाउपाध्यक्ष नरेश बागडे,  सुनील भोळे, मुकेश जोशी, दीपक सपकाळे, रितेश माळी, चेतन निंबोळकर, स्वप्नील सोनवणे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महावितरणात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा

Next Post

जिल्हा परिषद मुलांची शाळा व गृप ग्रामपंचायत भराडी,भिलखेडा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Next Post
जिल्हा परिषद मुलांची शाळा व गृप ग्रामपंचायत भराडी,भिलखेडा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या  उत्साहात साजरा

जिल्हा परिषद मुलांची शाळा व गृप ग्रामपंचायत भराडी,भिलखेडा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d