Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडकेंचा पालकमंत्र्यांचा हस्ते सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 26 – जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. विलास बोडके यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी जिल्हा प्रशासन व प्रसार माध्यमांशी उत्कृष्टपणे समन्वय ठेवून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली आहे.

जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी जळगाव शहर महानगरपालिका तसेच जिल्ह्यात झालेल्या लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या काळात मतदार नोंदणी व मतदार जनजागृती मोहिमेतही सक्रीय सहभाग घेतला आहे.

जळगाव जिल्ह्याचा संदर्भग्रंथ म्हणून महत्वपूर्ण ठरलेल्या जळगाव जिल्हा कॉफीटेबल बुकच्या निर्मिती व संपादनाचे महत्वपूर्ण कामही पार पाडले आहे. जलयुक्त शिवार अभियान व जलशक्ती अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यात झालेल्या कामांवर आधारित माहितीपट निर्मितीसाठीही श्री. बोडके यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर शासनाच्या महाअवयदान, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना, शेतकरी कर्जमाफी, पल्स पोलिओ, गोवर व रुबेला लसीकरणाचीही उत्कृष्टपणे प्रसिध्दी केली आहे.

जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी जळगाव जिल्ह्यात केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामांची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी त्यांचा सन्मान करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मेंदूचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी काळजी घेणे आवश्यक-डॉ. संतोष जळूकर

Next Post

वाकोद वाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

वाकोद वाडी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo