<
जामनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाकोद वाडी येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहात व पालकांच्या प्रचंड उपस्थिती संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरवातीला जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी भेट दिली व सर्व विद्यार्थ्यांना रोख बक्षिस दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिनगर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अमोल नलावडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मीनाक्षी गोसावी, उपाध्यक्षा हिना गोसावी, जयश्री गोसावी, ईश्वर जोशी, ग्राम पंचायत सदस्य उज्जवला वाघमोडे, अतिश गोसावी, शिक्षक वीरभद्र समशेट्टे, प्रशांत वाघ, योगेश काळे, निलेश भामरे, सतीश भोसले, चंद्रशेखर पाटील, छगन चव्हाण, विजया चव्हाण, संगीता घोडके, वीरू गोसावी, शिवाजी बुधवंत, हितेश गोसावी, किशोर गोसावी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन वडाळी दिगर शाळेचे उपशिक्षक संदिप पाटील यांनी तर आभार वीरू गोसावी यांनी मानले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देवा श्रीगणेशा, मैने पायलिया छनकायी, पिंगा ग पोरी पिंगा, बोले चुडिया बोल कंगना, नन्हा मुन्हा राही हु, सुनो गोर से दुनियावालो, शंकरा असे एक ना अनेक विविध गाण्यांवर नृत्य सादर केले नागरिक,पालक यांनी देखील टाळ्या, रोख बक्षिसाच्या रुपात प्रतिसाद दिला.