<
शिक्षण विभाग व शिक्षण विस्तार अधिकारी संघटना यांचा उपक्रम
जळगाव(प्रतिनीधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आंतरराष्ट्रीय शाळा जि प शाळा वाबळेवाडी जिल्हा पुणे येथे दोन दिवसीय अभ्यासदौऱ्याचे आयोजन ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील व प्राथमिक शिक्षणाधिकारी के बी रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी डॉ डी एम देवांग यांच्यासोबत तेरा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा चमू वाबळेवाडी शाळेला भेट देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ, पालक सहभाग, सी एस आर अंर्तगत शाळा विकास इत्यादी मुद्द्यावर या दौऱ्यात माहीती घेतली जाणार आहे. या दौऱ्यात डॉ डी एम देवांग यांचेसोबत शिक्षण विस्तार अधिकारी नवाज तडवी रावेर, विजय पवार, राजेंद्र सपकाळे, फिरोज पठाण, खलील शेख, अनिल बाविस्कर, अशोक बिऱ्हाडे, रवींद्र सपकाळे चाळीसगाव, समाधान पाटील, एजाज शेख, नईमोद्दिन शेख, सुधाकर गजरे, गणेश पाटील, यांचा सहभाग आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या जळगाव शाखेमार्फत स्वखर्चाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे नमुद करत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील यांनी कौतुक केले आहे.