<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती व प्रोग्रेसिव्ह शाळेत ७१ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन श्री प्रेमचंद ओसवाल यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारले होते. तर संस्थाध्यक्ष मंगलाताई दुनाखे व संस्थेचे सचिव श्री सचिन दुनाखे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्री प्रेमचंद जी ओसवाल विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले,आपल्या भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आपल्या देशाला दिले आहे. सविधान हे स्वातंत्र्य ,समता व बंधुता या त्रयीवर आधारित आहे. त्यामुळे लोकशाही राज्य म्हणून भारत देश जगाच्या पाठीवर यशस्वी देश म्हणून उभा आहे. लोकशाही देश म्हणून अधिक समृद्ध अधिक सुदृढ लोकशाहीकडे आपण वाटचाल करीत आहोत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर नेत्यांचे आपण स्मरन केले पाहिजे. आपल्या देशाची गौरव गाथा फार अभिमानास्पद आहे. आपल्या भारताचा तिरंगा ध्वज फडकविताना छाती अभिमानाने फुलून जाते असे भावनिक व अभिमानाचे उदगार त्यांनी याप्रसंगी संबोधित करताना सांगीतले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रगति व प्रोग्रेसिव शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले व उपस्थितांचे मने जिंकली. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुवर्णा पाटील यांनी केले. तार संविधानाचे प्रास्ताविक वाचन सौ संध्या अठरावल कर यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्रीमती हर्षदा पाटील यांनी केले तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना जाहिर मार्गाशी लढा या बाबत शपथ देण्याचे काम प्रगती माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी केले.